Thursday, 5 January 2017

.. आहेस तु


पहिल्या पावसात मातीचा दरवळणारा गंध तु,
मला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न..  आहेस तु,

चिमुकल्या मुलीची निरागसता आणी सुंदर तरुणीचे मोहक हास्य तु,
ओढ्याच्या खळाळत्या पाण्याचा आवाज आणि नदीवरची शांतता.. आहेस तु,

जो ऐकताना पापण्यांनी फ़डफ़डण, हृदयाने धडधडन विसरावं असा आवाज तु,
या क्षणभंगुर जीवनातील जगण्याची उमेद.. आहेस तु

देवघरातील जास्वदांचं फुल, सकाळच्या सूर्याची पहिली किरणे तु  
काळोख्या रात्रीत एकटाच उजेड पेरत फिरणारा काजवा.. आहेस तु,

माझ्या रिकाम्या हाताने जगातली सगळी सुख जीला द्यावी अशी 'ती' तु
जीव सतत जिच्या भोवती घुटमळावा, घोंगवावा अशी मधु.. आहेस तु

बाटलीमध्ये बंद करून पुन्हा पुन्हा जगावा असा क्षण तु,
श्वासही जिच्याबरोबर वाटून घ्यावा अशी प्रेयसी.. आहेस तु,

जिच्या विरहात रातभर आसवं गाळावीत अशी सखी तु ,
आणि जातानासुद्धा छातीत कायमचा गोड दुखणं देऊन जावी अशी प्रियंवंदा..  आहेस तु